रामराज्याची दृष्टी

तं वन्दे रघुनन्दनम् 

राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांनी एके ठिकाणी म्हटले आहे ;

जो अगणित लघु दीप हमारे
तूफानों में एक किनारे,
जल-जलाकर बुझ गए किसी दिन
मांगा नहीं स्नेह मुंह खोल।
कलम, आज उनकी जय बोल

असं म्हणतात की पाचशे वर्षाचा हा लढा आहे. बाबर, खीलजी यासारख्या आक्रमण कर्त्यांनी भारताची लूट तर केलीच पण त्यांना एक प्रचंड भीती होती की जे इथल्या लोकांच्या मनातले प्रेरणास्थान आहे आणि ते निरंतर त्यांच्या अंतरात जागृत आहे त्याची लूट किंवा त्यावर कुठल्याही प्रकारे मात करता आली नाही त्यामुळे त्याचे बाह्य प्रतीक समजल्या जाणाऱ्या मंदिरांना त्या दहशतवाद्यांनी उध्वस्त केलं, त्यावर आपले प्रतीकं उभारले पण बाकी त्यांना इथे लढावेच लागले. श्रीराम जन्मभूमीचा इतिहास अशाच काहीशा लढ्याचा, लढवैयांचा आहे. जो वर्षानुवर्षे प्रत्येकाच्या अंतरातून लढल्या जात आहे, जात होता; ज्याने स्वतःच्याच पोलिसांच्या गोळ्या झेलेल्या आणि प्राण सोडतांना सुद्धा रामाचेच स्मरण ठेवले अश्या विरांना नमन;

जला अस्थियां बारी-बारी
चिटकाई जिनमें चिंगारी,
जो चढ़ गए पुण्यवेदी पर
लिए बिना गर्दन का मोल।
कलम, आज उनकी जय बोल

पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या लढ्याला लोकशाही मार्गाने सर्वोच्य न्यायालयात न्याय मिळवून देणारे डॉ सुबरह्मण्यम् स्वामी हे हनुमंताच्या च बुद्धीचातुर्याने लढले आणि आजही अनेक रावणांच्या लंकेला आग लावण्याचे पवित्र कार्य करत आहेत असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.

उत्तर भारतात आपण थोडी भ्रमंती केली तर हनुमंताची भक्ती सादर करणारं एक गाणं सहसा सर्वत्र ऐकू येतं, पहाडी रागातलं आणि पहाडी आवाजातलं..
ना चलाओ बाण,
व्यंग के ए बिभिषण,
ताना ना सह पाऊं,
क्यूं तोड़ी है ये माला,
तुझे ए लंकापति बतलाऊ।...

आणि पुढ़े तो दोहा पूर्ण करून लखबिर सिंग लक्खा हनुमान कसे विभिषणला छाती फाडून माझ्या आतमध्ये जानकी रामाचा फोटो आहे हे सांगताना समेवर येऊन "जय श्रीरामSS" च्या गर्जनेत  गायला सुरू करतात.. श्रीराम जानकी बैठे है मेरे सीने में।..
अशी छाती फाड रामभक्ती श्रीरामजन्मभूमी कारसेवे नंतर बऱ्याच वेळेला उफाळून बाहेर आली, त्यामुळे अनेक सेक्युलर लंकापतींच्या स्थान विशेष भगावर आग लागली लागलेली होतीच म्हणूनच की काय भूमिपूजनाची तारीख ठरल्यावर फैज की मिट्टी, जमशेद की ईट, सईद का सरिया सारख्या सेक्युलर कॅम्पेन ची सुरवात करून पाहिली पण हाय रे दैवं. खरंतर "मंदिर वही बनाएंगे, पर तारीख नहीं बताएंगे" अश्या अनेक "ताना" आपल्याच विभिषणांकडून घेतल्या गेल्या पण त्यांनाही मुख्यमंत्री.. म्हणजे लंकापती म्हणून मिरवायच होत काय करणार...
त्यामुळे अश्या छाती फाड भक्तीला राष्ट्र निर्मितीच्या शक्तीत रुपांतरीत करावे अशी साद मोदींनी अयोध्येतून घालावी ही फार मोठी आणि उंचीची गोष्ट आहे. येणाऱ्या काळात तिथे नवीन अर्थव्यवस्था उभी राहू शकते हे कोणीही सांगू शकेल पण आत्मनिर्भर भारतातून ती अर्थव्यवस्था उभी राहावी ही मोदींची खासियत आहे. ही मोदींची दृष्टी आहे.

असं म्हणतात की राम राज्याचा खरा संस्थापक त्याची निर्मिती करणारा भरत होता, रामाच्या पादुका घेऊन त्याने राम राज्य चालवले आणि ठरलेल्या दिवशी ते रामाला सुपूर्त केले आणि त्या सारखेच कार्य हनुमंतांचे ही आहे त्यामुळेच भगवान स्वतः हनुमानाला "तुम मम प्रिय भरतहि सम भाई।" असं म्हणतात. आज त्या हनुमंताच्याच प्रेरणेने श्री #मोदी, #योगी_आदित्यनाथ जी, #आचार्य_गोविंददेवगिरीजी, आदरणीय #सरसंघचालक आणि असंख्य संतगण यांनी राम राज्याचा संकल्पनेची निव रचली ही भारतासाठी मोठी भाग्याची गोष्ट तर आहेच पण जसं समर्थांनी म्हटलं आहे,

प्रगट रामाचे निशाण। आत्माराम ज्ञानघन।
विश्वंभर विद्यमान। भाग्य कळे।।

जगाला प्रगटपणे अंतरातम्याचे (रामाचे) निशाण म्हणजेच सत्येची खूण जी ज्ञानमय आहे आणि जी सर्वत्र विद्यमान आहे हे मोठ्या भाग्याने कळून येईल. 

#सियावर_रामचंद्र_की_जय 
#पवनसुत_हनुमान_की_जय
#सब_संतन_की_जय
#जय_जय_रघुवीर_समर्थ

#AyodhyaRamMandir #AyodhyaBhoomipujan #Modi #YogiAditynath #Ayodhya 

- संदीप पौनीकर
५/८/२०२०