रामराज्याची दृष्टी
तं वन्दे रघुनन्दनम् राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांनी एके ठिकाणी म्हटले आहे ; जो अगणित लघु दीप हमारे तूफानों में एक किनारे, जल-जलाकर बुझ गए किसी दिन मांगा नहीं स्नेह मुंह खोल। कलम, आज उनकी जय बोल असं म्हणतात की पाचशे वर्षाचा हा लढा आहे. बाबर, खीलजी यासारख्या आक्रमण कर्त्यांनी भारताची लूट तर केलीच पण त्यांना एक प्रचंड भीती होती की जे इथल्या लोकांच्या मनातले प्रेरणास्थान आहे आणि ते निरंतर त्यांच्या अंतरात जागृत आहे त्याची लूट किंवा त्यावर कुठल्याही प्रकारे मात करता आली नाही त्यामुळे त्याचे बाह्य प्रतीक समजल्या जाणाऱ्या मंदिरांना त्या दहशतवाद्यांनी उध्वस्त केलं, त्यावर आपले प्रतीकं उभारले पण बाकी त्यांना इथे लढावेच लागले. श्रीराम जन्मभूमीचा इतिहास अशाच काहीशा लढ्याचा, लढवैयांचा आहे. जो वर्षानुवर्षे प्रत्येकाच्या अंतरातून लढल्या जात आहे, जात होता; ज्याने स्वतःच्याच पोलिसांच्या गोळ्या झेलेल्या आणि प्राण सोडतांना सुद्धा रामाचेच स्मरण ठेवले अश्या विरांना नमन; जला अस्थियां बारी-बारी चिटकाई जिनमें चिंगारी, जो चढ़ गए पुण्यवेदी पर लिए बिना गर्दन का मोल। कलम, आज उनकी जय बोल पिढ्यानपिढ्या चा...